खूप दिवसापासूनची भेट नाहीय
तुझ्या हव्याहव्याशा सहवासाचे क्षण
अजुनही आठवणींच्या शिरपेचात
तुर्रा बनून ताज्या
खूप जीव लावायचो एकमेकांना पत्र लिहायचो
घरगुती बहाणा करून !
पण तुझ्या अंतरंगाचा तळ दिसायचाय स्पष्ट त्यात. असायचं जीव गुंतल्याचं लव्हाळं
निर्मळ वाहत्या आस्थेच्या प्रवाहात
माझंही मन लहरायचं मोरपीसाच्या स्पर्शागत जिव्हाळ्याची टोकं झुलायचेत
काळीजफुलं गंधीत झाल्यागत
भरभरून बोलायचीस प्रत्यक्ष किंवा संवादध्वनीवरून
प्राणातले शब्द बहरून यायचेत
रोझ गार्डनची सहल केल्यागत
संवादाचा संथ ओहोळ वाहायचा
आपुलकिच्या अंतःप्रेरणेत
दोन्ही बाजुने उभ्या असलेल्या
पहाडातल्या खिंडी शोधून
मोकळेपणाने संवादसंधी शोधायचो
आस लागल्यागत.
आतून हिरवा कोंभ फुटायचा
कोणताही आडपडदा न ठेवता
तेजपाणी रूपाचीच केवळ नव्हती भूरळ आपल्याला
आपल्यातल्या आपलेपणातच रमायचो आपण
अन प्रतिसादाचे रेणू -परमाणू अनुभवायचो सहवासात
होतो प्रसन्न प्रज्ञेने प्रभावीत संवादसांधा जोडून !
जाणिवांचे आत्मभान विश्वासत होतो एकमेकात
अजुनही आठवणींच्या शिरपेचात
तुर्रा बनून ताज्या
खूप जीव लावायचो एकमेकांना पत्र लिहायचो
घरगुती बहाणा करून !
पण तुझ्या अंतरंगाचा तळ दिसायचाय स्पष्ट त्यात. असायचं जीव गुंतल्याचं लव्हाळं
निर्मळ वाहत्या आस्थेच्या प्रवाहात
माझंही मन लहरायचं मोरपीसाच्या स्पर्शागत जिव्हाळ्याची टोकं झुलायचेत
काळीजफुलं गंधीत झाल्यागत
भरभरून बोलायचीस प्रत्यक्ष किंवा संवादध्वनीवरून
प्राणातले शब्द बहरून यायचेत
रोझ गार्डनची सहल केल्यागत
संवादाचा संथ ओहोळ वाहायचा
आपुलकिच्या अंतःप्रेरणेत
दोन्ही बाजुने उभ्या असलेल्या
पहाडातल्या खिंडी शोधून
मोकळेपणाने संवादसंधी शोधायचो
आस लागल्यागत.
आतून हिरवा कोंभ फुटायचा
कोणताही आडपडदा न ठेवता
तेजपाणी रूपाचीच केवळ नव्हती भूरळ आपल्याला
आपल्यातल्या आपलेपणातच रमायचो आपण
अन प्रतिसादाचे रेणू -परमाणू अनुभवायचो सहवासात
होतो प्रसन्न प्रज्ञेने प्रभावीत संवादसांधा जोडून !
जाणिवांचे आत्मभान विश्वासत होतो एकमेकात
अचानक अघटितपणे अबोल दरीतून विमनस्कता
आली सलत हृदयाच्या शीर्षकाला छेदत
व्यवस्थेचे आडपडदे आलेत
संवादाच्या आड
क्षणात झाली बोथट धार
आता आपल्यातल्या निर्दोष संदर्भसूचीतून
निकोप सारांश वर्तमानावर उमटवणं
आणि आपल्या अस्वस्थतेच्या नियमनतारा
येणार्या पिढीच्या स्वस्थतेशी जोडणं
हाच उद्देश कायम !
आली सलत हृदयाच्या शीर्षकाला छेदत
व्यवस्थेचे आडपडदे आलेत
संवादाच्या आड
क्षणात झाली बोथट धार
आता आपल्यातल्या निर्दोष संदर्भसूचीतून
निकोप सारांश वर्तमानावर उमटवणं
आणि आपल्या अस्वस्थतेच्या नियमनतारा
येणार्या पिढीच्या स्वस्थतेशी जोडणं
हाच उद्देश कायम !
-मोहन शिरसाट, वाशीम .. .
mohan.shirsat@gmail.com